'बाहुबली 2' मधील नेमका कोणता सीन लीक?
मात्र सिनेमातील सस्पेंस सीन लीक झाल्यामुळे निर्मात्यांची चिंता चांगलीच वाढली आहे.
सिनेमाचा अभिनेता प्रभास याच्या जन्मदिनी नुकतंच या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.
बहुप्रतिक्षित ‘बाहुबलीः दी कन्क्लुझन’ या सिनेमाचा तब्बल 9 मिनिटांचा पार्ट लीक झाला आहे.
बाहुबली या सिनेमानंतर सर्व प्रेक्षकांना बाहुबलीला कटप्पाने का मारलं, हा प्रश्न पडला होता. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची सर्वांना उत्सुकता आहे.
बाहुबलीने कटप्पाला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर या पार्टमध्ये असल्याचं बोललं जात आहे. ‘बाहुबलीः दी कन्क्लुझन’ हा ‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सिक्वेल आहे.
सिनेमातील मुख्य अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्यातील एक सीन लीक झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
आंध्रप्रदेशातल्या विजयवाडा येथून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये, यासाठी निर्माते युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
एडिटिंग टीममधील एकाने हा पार्ट लीक केल्याची माहिती आहे. निर्मात्यांनी या प्रकरणी पोलिसात धाव घेतली आहे.