रोहित शर्मानं वनडेत आतापर्यंत कुठे-कुठे द्विशतक ठोकलं?
रोहित शर्माने तिसरं द्विशतक 13 डिसेंबर 2017 रोजी मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे ठोकलं. या सामन्यात त्यानं 153 चेंडूत 208 धावा केल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्माने दुसरं द्विशतक 16 नोव्हेंबर 2014 रोजी कोलकातामधील ईडन गार्डन मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे ठोकलं होतं. या सामन्यात त्याने 225 चेंडूत 264 धावा केल्या होत्या.
रोहित शर्माने पहिलं द्विशतक 2 नोव्हेंबर 2013 रोजी बंगळुरुत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत ठोकलं होतं. या सामन्यात रोहितनं 158 चेंडूत 209 धावा केल्या होत्या.
धर्मशाला वन डेत अब्रू गेलेल्या टीम इंडियाने मोहाली वन डेत फिनिक्सप्रमाणे भरारी घेतली. टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने खणखणीत द्विशतक ठोकून, श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई केली. रोहितचं हे कारकिर्दीतील तिसरं द्विशतक ठरलं. या सामन्यात रोहित शर्माने 153 चेंडूत नाबाद 208 धावा केल्या. यामध्ये त्याने 13 चौकार आणि 12 षटकार ठोकले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -