आजच्याच दिवशी युवीनं ठोकलेले सलग सहा षटकार!
218 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा संघ 200 धावांपर्यंतच मजल मारु शकला आणि भारतानं हा सामना 18 धावांनी जिंकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया खेळीत युवराजनं 6 चेंडूत 6 षटकारच ठोकले नाहीत तर 12 चेंडूत 50 धावा करुन टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक बनवण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.
युवराजानं ठोकलेल्या या सहा षटकारानंतर गोलंदाज ब्रॉड अक्षरश: हतबल झाला होता. युवराजचं फटका मारण्याचं टाइमिंग आणि ताकद याची खास झलक त्या दिवशी साऱ्यांना पाहायला मिळाली. त्या दिवशी भारतीय डग-आऊटमध्ये खेळाडू आनंदानं बेभान झाले होते. तर संपूर्ण स्टेडियममध्ये युवी-युवीचा जयघोष सुरु होता.
युवराजनं हा पराक्रम 19व्या ओव्हरमध्ये केला होता. त्याआधी संघाच्या धावा 171 होत्या. त्यानंतर अवघ्या 3 मिनिटात सारं काही बदललं आणि सहा षटकाराच्या आधारे टीम इंडियानं 4 विकेटच्या मोबदल्यात 218 धावांचं मोठं आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं.
क्रिकेटच्या इतिहासात हा विक्रम चार वेळाच झाल आहे. पण आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच झालं होतं.
19 सप्टेंबर 2007 हा दिवस युवराजसाठी सुवर्ण दिन ठरला होता. 2007 साली टी-20 विश्वचषकात टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये खेळविण्यात आलेल्या सामन्यात युवराज सिंहने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात सलग सहा षटकार ठोकले होते. टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच हा पराक्रम करीत त्यानं आपल्या नावाची इतिहासात नोंद केली.
टीम इंडियाचा 'सिक्सर किंग' युवराजनं आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक संस्मरणीय खेळी केल्या आहेत. पण, आजच्याच दिवशी 2007 मध्ये त्याने द. आफ्रिकेत डरबनच्या मैदानावर डोळ्याचं पारणं फेडणारी खेळी करुन इतिहास रचला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -