आता व्हॉटसअॅप यूजर्ससाठी कॉल बॅक आणि व्हॉईसमेल फिचर
सध्या हे फिचर फक्त बीटा व्हर्जन टेस्टर्सनाच वापरता येणे शक्य आहे. सामन्य यूजर्ससाठी हे व्हर्जन वापरण्यास उपलब्ध नाही. लवकरच याचे औपचारिक रित्या लोकार्पण होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फिचरच्या वापरासाठी यूजर्सना प्ले स्टोरमधून व्हॉटसअॅप गूगल प्ले बीट टेस्टिंग प्रोग्रामसाठी साईन इन करून अपडेट करावे लागेल. व्हॉटसअॅपच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनही APK व्हर्जन डाऊनलोड करता येईल.
या नव्या फिचरमध्ये जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीला व व्हॉटसअॅप कॉल कराल, आणि जर समोरच्या व्यक्तीने तुमचा कॉल कट केला, तर तुम्हाला कॉलबॅक किंवा व्हॉईसमेल ऑप्शन मिळेल. विशेष म्हणजे, यासाठी समोरच्या यूजरकडे अपडेट असण्याची गरज नाही.
व्हॉटसअॅप आपल्या यूजर्ससाठी एका पाठोपाठ एक नवीन फिचर्स आणण्याच्या तयारीत आहे. नव्या बीटा व्हर्जन अपडेटमध्ये व्हॉटसअॅपने दोन नवे फिचर्स अॅड केले आहेत.
बीटा टेस्टिंग यूजर्सना v2.16.189 व्हर्जनमध्ये नवीन कॉल बॅक आणि व्हॉईसमेल फिचर देण्यात आले आहे. कॉलबॅक आणि व्हॉईसमेलची चर्चा एप्रिलमध्ये सुरु झाली होती.
अपडेट केल्यानंतर तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्राला व्हॉटसअॅप कॉल केला. आणि जर समोरच्या व्यक्तीने तुमचा कॉल कट केला तर तुम्हाला कॉलबॅक आणि व्हॉईसमेलचा ऑप्शन मिळेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -