आता कलरफुल शब्दात स्टेटस ठेवा, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर
तुम्ही व्हॉट्सअपचे बीटा यूझर नसाल तर हे ऑफिशिअल व्हर्जन येईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल.
व्हॉट्सअपकडून इथे तीन पर्याय दिले जाणार आहेत. तुम्ही इमोजी अॅड करु शकता, फॉन्ट सिलेक्ट करु शकता आणि बॅकग्राऊंड कलरही बदलू शकता. यामुळे टेक्स्ट कलरफुल होईल.
या फीचरसाठी स्टेटस टॅबमध्ये कॅमेरा आयकॉनच्या वरती फ्लोटिंग पेन्सिल देण्यात आली आहे. फ्लोटिंग पेन्सिलने आवडीप्रमाणे कलर निवडता येऊ शकतात.
हे सर्व्हर साईड टेक्स्ट असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सर्व बीटा युझर्सला हे मिळेलच असं नाही.
अँड्रॉईड पोलिसच्या वृत्तानुसार कलरफुल टेस्क्ट फीचर बीटा 2.17.291 या व्हर्जनमध्ये आहे. व्हॉट्सअपचे बीटा युझर्स हे फीचर आत्ताही वापरु शकतात.
व्हॉट्सअप सध्या एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. फेसबुकने गेल्या वर्षीच कलरफुल टेक्स्ट फीचर स्टेटस टॅबमध्ये दिलं आहे. आता व्हॉट्सअपही हे फीचर आपल्या स्टेटस टॅबमध्ये आणणार आहे.