कलम 377: सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात सर्वांना समान अधिकार असायला हवेत. जुन्या विचारसरणीला बाजूला सारायला हवं. देशात सर्वांना सन्मानाने जगता आलं पाहिजे, असं कोर्टाने नमूद केलं.
LGBT( lesbian, gay, bisexual, transgender) या संपूर्ण कम्युनिटीसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे.
प्रत्येकाला आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे. जुनी विचारधारा बदलण्याची गरज, प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे. लोकांना आपली मानसिकता बदलायला हवी. समलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने निर्णय दिला.
समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -