बिहारमध्ये रात्री 12 नंतर काय घडलं?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसरीकडे लालू प्रसाद यादव यांनी राजदच्या आमदारांची बैठक घेऊन, तेजस्वी यादव पदाचा राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलं. तर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला होता.
या छापेमारीत तेजस्वी यादव यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती.
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली होती.
दुसरीकडे नितीश कुमार यांनी मात्र शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी केली आहे. भाजपच्या पाठिंब्यानं जेडीयू बहुमताचा आकडा अगदी सहज पार करु शकणार आहे. त्यामुळे आज सकाळी 10 वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.
भाजपच्या पाठिंब्यानं नितीश कुमार यांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्यानं लालूप्रसाद यादव यांचे चिंरजीव तेजस्वी यादव यांनी थेट रात्री अडीच वाजता राजभवनावर अनेक कार्यकर्त्यांसह मोर्चा काढला.
सुरुवातीला शपथविधी सोहळा आज (गुरुवार) संध्याकाळी पाच वाजता होणार होता. मात्र, आता त्याची वेळ बदलण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजता शपथविधी होणार आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल (बुधवार) राजीनामा दिल्यानंतर रात्रभर अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे नितीश कुमार यांच्या शपथविधीची वेळही बदलण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -