जळत्या निखाऱ्यावरुन चालण्याची अघोरी प्रथा!

जालिंदरमध्ये एका यात्रेदरम्यान जळत्या निखाऱ्यांवर लोक चालत असल्याची घटना समोर आली आहे. निखाऱ्यांवरुन चालताना घसरल्यानं एक पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्यांना एका फोटो जर्नलिस्टनं रुग्णालयात दाखल केलं.
त्यानंतर दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
यामध्ये ते दोघंही बरेच भाजले आहेत.
याच यात्रेमध्ये राजा नावाचा एक व्यक्ती आपल्या सहा वर्षाच्या कार्तिक नावाच्या मुलाला घेऊन निखाऱ्यावरुन चालत होता. मात्र तेव्हाच त्याचा तोल जाऊन ते दोघे गंभीर जखमी झाले.
जर निखाऱ्यावरुन चालत 20 फुटाचं अंतर पार केलं तर तुमच्यासोबत सारं काही चांगलं होतं. अशी येथील लोकांची समजूत आहे.
दरवर्षी या यात्रेत अशी अग्नीपरीक्षा होते. यामध्ये आपल्या मुलाला घेऊन जळत्या निखाऱ्यावरुन चालावं लागतं.