राणीच्या बागेत नव्या पाहुण्याचं आगमन
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2018 11:51 AM (IST)
1
नवीन पाहुण्यांचा नाव नेमकं काय ठेवणार याची उत्सुकता वाढली आहे.
2
40 दिवसांचा अवधी पूर्ण झाल्यावर बुधवारी या पिल्लाचा जन्म झाला.
3
राणीच्या बागेमध्ये नवीन पाहुणा दाखल झाला आहे. भायखळ्याच्या राणीच्या बागेत पेंग्विनचा जन्म झाला आहे.
4
भारतात जन्म घेणारा हा पहिला पेग्विंन ठरला आहे.
5
पेंग्विन कक्षांत सध्या सात पेंग्विन आहेत, यात आता आणखी एका नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे.
6
पेंग्विन मोल्ट आणि त्याची जोडीदार फ्लिपर यांनी या पेंग्विनला जन्म दिला आहे.