मेहंदी लगा के रखना... अनुष्का शर्माच्या लग्नाचे फोटो
एबीपी माझा वेब टीम | 11 Dec 2017 09:05 PM (IST)
1
इटलीमध्ये मिलानपासून काही अंतरावर असलेल्या एका शानदार रिसॉर्टमध्येच मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
2
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत.
3
एकमेकांसोबत कायमस्वरुपी प्रेमाच्या बंधनात अडकण्याचं वचन आज आम्ही घेतलं. ही बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, असं कॅप्शन दोघांनीही दिलं.
4
विराट कोहली आणि अनुष्का यांनी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास, एकाच वेळी लग्नाचे फोटो शेअर करुन या गोड बातमीवर शिक्कामोर्तब केलं.
5
मुंबईत 4 जानेवारी रोजी वांद्रे कोर्टात दोघं विवाहाची नोंदणी करणार असल्याची माहिती आहे.