'तुला पाहते रे'मधल्या इशा-विक्रांतच्या लग्नाचे फोटो
भोरमधील शूटिंग संपल्यानंतर सुबोध भावेने टीमचा फोटो शेअर केला आहे.
मालिकेत विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांच्या संगीत, मेहंदी आणि लग्नाची धूम आहे.
झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेत सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे.
मालिकेत येत्या 13 जानेवारीला हा विवाहसोहळा संपन्न होणार असून 11 तारखेला मेहंदी आणि 12 तारखेला साखरपुडा होणार आहे.
लग्नासाठी कुटुंबीयांकडून परवानगी मिळवण्यासाठी इशा आणि विक्रांतने बरेच अडथळे पार केले.
लग्नाच्या एपिसोडचं शूटिंग पुण्यातील भोर इथे नुकतंच पार पडलं.
या सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.
अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
गायत्रीने या मालिकेतून पदार्पण केलं आहे. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडली आहे.
अभिनेता सुबोध भावे यामध्ये विक्रांतची भूमिका साकारत असून गायत्री दातार इशाच्या भूमिकेत आहे.
अखेर 13 जानेवारी रोजी प्रसारित होणाऱ्या महाएपिसोडमध्ये त्यांचं लग्न पाहता येणार आहे.