वी द ट्विन्स... 02-02-2020 च्या निमित्ताने चिपळूणमध्ये जुळ्या-तिळ्यांचा मेळावा
या मेळाव्यात तिळे म्हणजेच एकसारखे दिसणारे तीन भाऊ देखील सहभागी झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुळ्यांचे किवां तिळ्यांचे आयुष्य कसं असतं आणि त्यांच्या गमतीजमती त्यांनी एबीपी माझाशी शेअर केल्या.
02-02-2020 हा दिवस चिपळूणकरांसाठी अभूतपूर्व ठरला. कारण या दिवशी चिपळूण रोटरी क्लबतर्फे जुळे, तिळे जोड्यांचा मेळावा भरवण्यात आला होता.
या मेळाव्यात जुळ्या भावांचे, जुळ्या बहिणींचे, तिळ्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
अशा या जुळ्या-तिळ्यांचा मेळावा चिपळूणमध्ये पहिल्यांदाच मेळावा घेण्यात आला होता.
सेम बहिणी, सेम भाऊ, सेम काकू आणि सेम काका पाहण्याची संधी चिपळूणकरांना मिळाली
या मेळाव्यात लहानांपासून मोठ्यापर्यंत महिला आणि पुरुष अशा जवळपास पन्नास ते साठ जोड्या सहभागी झाल्या होत्या.
खरंतर आपण अनेक वेळा चित्रपटात सेम टू सेम दिसणारे कलाकार पाहतो. पण चिपळूणकरांना पहिल्यांदाच एवढ्या जुळ्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळालं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -