जलमय नांदेडचे फोटो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड जिल्ह्यातल्या 16 पैकी 13 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या घरात देखील 3 ते 4 फूट पाणी शिरलं आहे.
पुढे पाहा नांदेडमधील पावसाचे आणखी फोटो
यात औरंगाबादमध्ये 35.47 मिमी, जालना 32.19 मिमी, परभणी 42.21 मिमी, हिंगोली 44.96, नांदेड 100.86, बीड 68.47, लातूर 104.55 मिमी, उस्मानाबाद 65.09 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 61.72 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात 3 ते 4 फूट पाणी शिरलं आहे. त्यामुळे आयुक्तांसह शहरातील इतर नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
मुसळधार पावसामुळे दत्तनगर, विष्णुनगरसारख्या ठिकाणांमध्ये मोठं पाणी साचलं आहे. यासोबत नांदेडहून मुंबईला जोडणाऱ्या महामार्गावरही पाणी साचल्यानं इथंही वाहनांची गर्दी झाली आहे.
गेल्या २४ तासात नांदेड शहरात तुफान पाऊस सुरु असून, शहरातील सर्वभाग जलमय झाला आहे. आतापर्यंत शहरात १४४ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस नोंद करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -