'या' कारणांमुळे लहान मुलं आत्महत्या करतात
घरात सतत वाद आणि हिंसक प्रकार होत राहिल्यास मुलांमध्ये नकारत्मकतेचं प्रमाण वाढून मुलांमध्ये नैराश्य निर्माण होतं, असं फुलर थॉम्सन यांनी सांगितलं.
ज्या मुलांनी बालपणात कौटुंबिक वाद पाहिले आहेत, त्यांच्या आत्महत्येचं प्रमाण 17.3 टक्के आहे. तर घरात शांत वातावरण लाभलेल्या मुलांचं आत्महत्येचं प्रमाण केवळ 2.3 टक्के आहे.
मुलं लहान असताना घरातील आई-वडिलांचे वाद हे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम करतात. यामुळे मुलांमध्ये चिडचिडपणा वाढतो, ज्यामुळे ते आत्महत्याही करतात.
हे संशोधन ऑनलाईन मासिक चाईल्ड केअर, हेल्थ अँड डेव्हलपमेंटमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.
कॅनडामध्ये 22 हजार 559 कुटुंबांचा अभ्यास करुन हे संशोधन करण्यात आलं आहे.
घरातील आई-वडिलांचा सततचा हिंसक वादही लहान मुलांच्या आत्महत्येचं कारण ठरु शकतो, असं एका संशोधनात समोर आलं आहे. लेखक फुलर थॉम्सन यांनी हे संशोधन लिहिलं आहे.