पंढरीची वारी | माऊलींच्या पालखीचे गोल रिंगण, ड्रोन कॅमेऱ्याने घेतलेली नयनरम्य दृश्य
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2019 11:33 AM (IST)
1
अवघ्या दोन दिवसांवर आषाढी आली आहे आणि पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.
2
माऊलींच्या पालखीने आज वेळापूरहुन प्रस्थान ठेवल्यानंतर ठाकुरबुवांची समाधी या ठिकाणी गोल रिंगण पार पडले.
3
या सोहळ्यासाठी वारकऱ्यांसह परिसरातील हजारों भाविकांनी उपस्थिती दर्शविली.
4
मुक्काम दर मुक्काम करत आषाढी वारीला निघालेल्या वारकऱ्यांना आता पंढरपूर टप्प्यात आलेय.
5
6
पालखीतळावर याच तंबूमध्ये माऊलींच्या पादुका ठेवलेल्या असतात दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावून लोक दर्शन घेत असतात.
7
माऊलीच्या पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पालखी तळावर होणारी ही गर्दी.
8
9
पालखी तळ | माऊलींची पालखी ज्यावेळी मुक्कामी पोहोचते आणि ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो त्याला पालखी तळ म्हणतात.