26/11 हल्ला अन् विश्वास नांगरे-पाटील
त्यात त्यांनी त्यांच्या आयुष्याचे कंगोरे उलगडून दाखवले आहेत. यानिमित्तानं आम्ही त्यांना माझा कट्ट्यावर आमंत्रित केलं आणि त्याचवेळी रंगल्या दिलखुलास गप्पा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविश्वास नांगरे पाटील यांचं ‘मन मे है विश्वास’ नावाचं त्यांचं पुस्तक नुकतंच बाजारात आलं आहे.
'यामुळेच थेट आत घुसून दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला केला.’ हा अंगावर काटा आणणारा अनुभव आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी माझा कट्ट्यावर सांगितला.
'ताजमध्ये हल्ला होत असताना आत जावं की न जावं हा प्रश्नच मनात आला नाही. कारण की, आतून येणारे आवाज, गोळ्या, ग्रेनेड याची बरसात होत असताना दहशतवाद्यांना प्रतिकार करणं अपरिहार्य होतं.'
'पण तो क्षणच ऐवढा दोलायमान होता. म्हणूनच मी कुटुंबीयांशी न बोलण्याचा निर्णय घेतला.'
'यावेळी घरच्यांशी फोनवर न बोलण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझ्या गावी अंत्यसंस्काराची तयारी करा असेही मेसेज पोहचले होते.'
‘माझा पत्नीला ५ वाजेपर्यंत माहितच नव्हतं की मी जिवंत आहे की, नाही. पहाटे तीन वाजता माझ्या अंगरक्षकाला 3 गोळ्या लागल्या होत्या.'
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -