सेहवागचे हे ट्विट वाचून तुम्हीही व्हाल हैराण!
सेहवागच्या या ट्वीटवर एक नजर टाका, ‘आंखे बंद करने से नहीं, टेंशन फ्री होने से नहीं, थकने से भी नहीं, आज के ज़माने में तो WiFi बंद करने से ही नींद आती है'
केकेआरच्या गोलंदाजांची मस्करी करत सेहवागनं हा फोटो अपलोड केला होता. 'हा केकेआरचा बॉलिंग अॅटक आहे. Holder आणि Morne
सहवागनं बॅटमिंटनपटू सायनाचंही आगळयावेगळ्या पद्धतीनं कौतुक केलं.
कर्णधार धोनीच्या वाढदिवसाला सेहवागनं शुभेच्छा दिल्या. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा धोनी, आशा करतो की, तू नेहमीच अनहोनीला होनी करशील. #नॅशनलहेलिकॉप्टरडे
सहवागनं प्रदूषणावरही ट्वीट केलं होतं. 'ज्या कारमधून धूर निघतो, त्यावर बंदी घातली पाहिजे आणि जी लोकं धूर काढतात त्यांच्यावर देखील बंदी हवी.'
केविन पीटरसनला सेहवागनं एका वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या होत्या. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, जेव्हा आपण दिल्लीसाठी एकत्र खेळायचो तेव्हा मी नेहमी विचार करायचो की, 'केपी' बॉल 'सीपी'मध्ये पोहचवेल.
टेनिस स्टार सेरेना विलियम्सचं कौतुक करताना सहवागनं ट्विट केलं होतं की, 'हिचं नाव SereNa आहे, आणि ही विजयालाही Na म्हणत नाही. आता तर सगळे टायटल्स जिंकण्याचा सवयच लागली आहे.'
शोएबने एक फोटो अपलोड केला होता. ज्यामध्ये वसीम अक्रम, वकार युनूस हे होते. त्याच्या कॅप्शनमध्ये शोएबने बरंच काही लिहलं होतं. यावरच सेहवागनं ट्विटरवरुनच त्याला टोला हाणला होता. 'खूपच चांगली टीम आहे शोएब भाई, बरेच लिजेंड आहेत टीममध्ये, पण तरीही अद्याप कोणत्याही विश्वचषकात भारताला हरवू शकले नाही. अजूनही 'मौका'च शोधत आहात.'
पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू जहीर अब्बास यांच्या वाढदिवसानिमित्त अशा शुभेच्छा दिल्या होत्या. 'हॅप्पी बर्थडे जहीर अब्बास सर, हे खरं आहे की, जेव्हा तुम्ही इंडियाविरुद्ध बॅटिंग करायचा तेव्हा आम्ही खरंच म्हणायचो. की, जहीर Ab Bas कर, पण सुनील गावसकरांची एकमेव विकेट जहीर आहे.'
सामना जिंकल्यानंतर अश्विनचं कौतुक करताना सेहवाग म्हणतो की, 'जेव्हा तुमच्याकडे Ashwin सारखा खेळाडू असतो. त्यावेळी आपल्या विजयासोबत Ash पण होते.
सामन्यातील पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करणारा वीरेंद्र सेहवाग ओळखला जायचा. पण आता त्याची ट्विटरवर फटकेबाजी पाहायला मिळते आहे. पाहा सेहवागचे असे ट्विट ज्यानं तुम्हीही विचार कराल. की, सेहवाग वाहवा करतो आहे की, मस्करी?