विराट कोहलीचा नवा लूक
नुकतंच विराटची नवी हेयरस्टाईल समोर आली. विराटने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आता आयपीएलच्या तयारीला लागला आहे. 7 एप्रिलपासून आयपीएलचा अकरावा हंगाम सुरु होईल.
क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतल्यानंतर, कोहलीने स्वत:साठी वेळ काढला. यामध्ये त्याने हेअरस्टाईलपासून टॅटूपर्यंत सर्वकाही करुन घेतलं. मुंबईतील एका प्रसिद्ध टॅटू पार्लरमध्ये विराट टॅटू रेखाटताना दिसला होता.
प्रसिद्ध हेयरस्टायलिश आलिम हकीमने विराटला नवा रुप दिला आहे.
नुकतीच टीम इंडिया तिरंगी टी ट्वेण्टी मालिका जिंकून भारतात परतली. मात्र या मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. यादरम्यान कोहलीने सुट्ट्या एन्जॉय केल्या.
विराट त्याच्या केसांची विशेष काळजी घेतो.
म इंडियाचा दुसरा स्टाईलिश खेळाडू हार्दिक पंड्याही स्टाईल आयकॉन म्हणून समोर येत आहे. पंड्याही नवनवी हेयरस्टाईल करत असतो.
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची हेयरस्टाईलही नेहमीच चर्चेत असते.