'त्या' व्हायरल फोटोवर विराट आजच्या सामन्यात खुलासा करणार
या सर्व प्रकरणानंतर विराटने आयपीएमधील आपल्या संघाच आव्हान संपुष्टात आल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे. काही दिवसांपासून चुकीच्या कारणांमुळे माझे काही फोटो व्हायरल होत आहेत. माझ्या फिटनेसची चिंता असणाऱ्या चाहत्यांचे मला मेसेजही येत आहेत. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं आज रात्रीच्या सामन्यातील पहिल्या स्ट्रॅटेजिक टाइम आऊटमध्ये मिळतील, असं विराटने म्हटलं आहे.
आयपीएल सामन्यांदरम्यान सराव सत्रात विराट चिप्स खाताना आढळून आल्याचा काही वृत्तांमध्ये दावा आहे.
काही दिवसांपासून विराटचा चिप्स खातानाचा फोटो व्हायरल होत आहे. फिटनेसच्या बाबतीत नेहमी सजग राहणाऱ्या विराटला यो फोटोमुळे ट्रोलही करण्यात आलं.
मात्र या सामन्यानंतर विराट कोहली त्याच्या एका फोटोवर स्पष्टीकरण देणार आहे, जो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्सकडून 30 धावांनी झालेल्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्लेऑफच्या शर्यतीतलं आव्हानही संपुष्टात आलं.