शूटींगसाठी अनुष्का हंगेरीला रवाना, अलिवदा करण्यासाठी विराट एअरपोर्टवर पोहचला!
(Photos: Manav Mangalani)
सुल्तानच्या शूटींगनंतर अनुष्का आपला आगामी सिनेमा 'फिल्लौरी'च्या शूटींगसाठी पंजाबमध्ये जाणार आहे.
अनुष्का या सिनेमात महिला रेसलरची भूमिका साकारत आहे.
काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील जबरदस्त गाणं रिलीज करण्यात आलं. ज्यामध्ये अनुष्कानं लाजबाब डान्स केला आहे.
सिनेमाच्या पटकथेला अनुसरुन हंगेरी लोकशन निवडण्यात आलं आहे. युरोपात हंगेरी 'रेसलिंग कॅपिटल' ओळखलं जातं.
अनुष्का आणि सलमान दोघं हंगेरीसाठी रवाना झाले आहेत. सहा जूनपर्यंत तिथं सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं जाणार आहे.
अनुष्काला 'बाय-बाय' करताना विराट (Photo: Manav Mangalani)
एअरपोर्टवर दोघं अनेकदा एकत्र पाहायला मिळाले आहेत. पण अनुष्काला अलविदा करण्यासाठी पहिल्यांदाच विराट एअरपोर्टवर गेला होता.
हा फोटोच सांगतो की, विराट कोहली आपल्या प्रेमविषयी किती सीरियस आहे.
सुल्तान सिनेमाचं पुढचं शूटींग हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये होणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा 'सुल्तान' सिनेमाच्या शेवटच्या भागातील शुटींगसाठी हंगेरीला काल रवाना झाली. मुंबई एअरपोर्टवर तिला 'बाय-बाय' करण्यासाठी बॉयफ्रेंड आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली आला होता. पाहा विराट आणि लव्ह लेडीचे खास फोटो