मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं कोहलीकडून कौतुक
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय राजकारणात आतापर्यंत जेवढे निर्णय घेतले आहेत, त्यापेक्षा सर्वोत्तम निर्णय म्हणून या निर्णयाकडे पाहतो, असं कोहली म्हणाला.
यापूर्वी माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. शहीद जवान हनुमंथप्पा देशासाठी बर्फाखाली 6 दिवस राहिले, आपण काही तास वाट पाहू शकत नाही का, असा सवाल सेहवागने विचारला होता. याशिवाय माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही 500-1000 च्या नोटाबंदी निर्णयाचं समर्थन केलं आहे.
इतकंच नाही तर या निर्णयाचं मी खुल्या दिलाने स्वागत करतो, मी या निर्णयाने खूपच प्रभावित झालो आहे, असंही कोहलीने म्हटलंय.
नोटबंदीवरुन देशभरात आता वादाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी विरोध केला आहे. मात्र आता मोदींच्या निर्णयाचं समर्थन करणाऱ्यांच्या यादीत टीम इंडियाच्या डॅशिंग खेळाडूची भर पडली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -