'मी भाग्यवान आहे, मला विराट सारखा खेळाडू मिळाला...'
विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावरील सर्वाधिक फिट खेळाडू समजला जातो. फक्त आपल्या बॅटिंगनेच नाही तर फिल्डिंगनंही तो विरोधी टीमच्या मनात धडकी भरवतो.
विराट कोहली
फिटनेसबाबत त्यानं 90 टक्के काम केलं आणि मी त्याला फक्त फिनिशिंग टच दिला.
मी त्याला फक्त फिटनेस मिळविण्यासाठी योग्य तंत्राचा वापर करण्यास मदत केली.
'विराटनं त्याच्या लाइफस्टाइलमध्ये बराच बदल केला आहे. मी फक्त एक निमित्तमात्र आहे.'
'मी आठ वर्षापासून आयपीएलमध्ये विराटसोबत काम करीत आहे.'
यापुढे जाऊन बसू म्हणाला की, 'अनेक खेळाडू म्हणतात की, त्यांना चांगला कोच मिळालं हे त्यांचं भाग्य आहे. पण मी स्वत: भाग्यवान आहे. कारण की, मला विराट सारखा खेळाडू मिळाला.'
'विराटसमोर अनेक रोल मॉडेल आहेत. त्यामुळे तो प्रतिस्पर्ध्यांना घाबरत नाही. तो त्यांच्या यशस्वीपणे सामना करतो.'
कोहलीच्या फिटनेसचं गुपित सांगताना बसू म्हणाला की, 'विराटनं जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू होण्याचं ठरवलं आहे.'
'कोहलीनं आपल्या फिटनेसवर बरीच मेहनत केली आहे आणि त्याचाच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो आहे. त्याचा आजचा फॉर्म हे त्याच्या फिटनेसमुळेच शक्य आहे.'
टीम इंडिया आणि आरसीबीचा फिटनेस कोच शंकर बसूच्या मते, 'विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू व्हायचं आहे.'