सचिन-गावसकरांना मागे टाकत विराट सर डॉन ब्रॅडमन यांच्या यादीत

विराटने हे शतक पूर्ण करण्यासाठी 184 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये सात चौकारांचाही समावेश होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कसोटीत सर्वाधिक वेगाने 24 शतक पूर्ण करणारा विराट जगातला दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने 123 डावांमध्येच ही कामगिरी केली.

या शतकासोबतच विराटने अशा यादीत स्थान मिळवलं आहे, जिथे त्याच्या पुढे फक्त सर डॉन ब्रॅडमनच आहेत.
विराटने या कसोटीतील पहिल्या डावात खणखणीत शतक पूर्ण केलं. विराटच्या कसोटी कारकीर्दीतलं हे चोविसावं शतक ठरलं.
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवशी पृथ्वी शॉ आणि दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचला आहे.
लिटल मास्टर सुनील गावसर यांच्या नावावर 128 डावांमध्ये 24 शतक पूर्ण करण्याचा विक्रम आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने 24 शतक पुढ करणाऱ्या फलंदाजांमध्ये फक्त सर डॉन ब्रॅडमन पुढे आहेत, ज्यांनी 66 डावांमध्येच हा विक्रम केला होता.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे, ज्याच्या नावावर 125 डावांमध्ये 24 शतक आहेत. विराटने आता सचिनलाही मागे टाकलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -