प्रेयसी दुसऱ्यासोबत फिरत होती म्हणून हत्या
हत्येच्या दिवशी देवेंद्र प्रेयसीला घेऊन तुंगारेश्वर येथे गेला होता. त्यानंतर त्यानं तिला तिथल्या पाण्यात बुडवून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह रिक्षातून नेऊन तिच्या सोसायटीजवळ फेकून दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरोपी देवेंद्र आणि 19 वर्षीय तरुणीचं प्रेमप्रकरण सुरु होतं. मात्र, एका दुसऱ्याच तरुणाबरोबर प्रेयसीला फिरताना पाहिल्यानं देवेंद्रला राग आला.
आरोपीचं नाव देवेंद्र दिनकर भोसले (24 वर्ष) असून तो नालासोपाऱ्यातील मोरेगांवमधील एकविरा अपार्टमेंटमध्ये राहणारा आहे.
विरारमध्ये मंगळवारी एकोणीस वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला. या तरुणीची हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 24 वर्षीय प्रियकरानंच तरुणीचा खून केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
मयत तरुणी सोमवारी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी दाखल केली होती. दुसऱ्याच दिवशी राहत्या इमारतीच्या शेजारीच मृतदेह सापडल्याने तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.
तुलिंज पोलिसांना चौकशी दरम्यान, किंजलची हत्या करणारा आरोपी सापडला. चौकशी दरम्यान त्याने अर्नाळा पोलिसात किंजलचा खून केल्याचं कबूल केलं.
देवेंद्र आणि किंजल यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. मात्र, एका दुसऱ्याच तरुणाबरोबर किंजलला फिरताना पाहिल्यानं त्याला राग आला होता.
विरारमध्ये मंगळवारी एकोणीस वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृतदेह सापडलेल्या किंजल शहा हिची हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 24 वर्षीय प्रियकरानंच किंजलचा खून केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -