हरियाणात राम रहीमच्या भक्तांचा हैदोस
बाबा राम रहीमला 28 ऑगस्टला शिक्षा सुनावली जाणार आहे. बाबाला 7 ते 10 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडेरा सच्चा सौदा आश्रम सुमारे 68 वर्षांपासून सुरु आहे. डेरा सच्चा सौदाचं साम्राज्य देश परदेशात पसरलं आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यूएईपर्यंत डेराचे आश्रम आणि अनुयायी आहेत. जगभरात डेराचे जवळपास पाच कोटी अनुयायी आहेत. ज्यापैकी सुमारे 25 लाख अनुयायी एकट्या हरियाणात आहेत.
यादरम्यान, गुरमीत राम रहीमने फेसबुक आणि ट्विटरद्वारे अनुयायींना शांततेचं आणि पंचकुला न जाण्याचं आवाहन केलं आहे. “मी कायम कायद्याचा आदर केला आहे. मला पाठदुखी आहे, तरीही मी कायद्याचं पालन करुन कोर्टात हजर राहणार. मला देवावर पूर्ण विश्वास आहे. सगळ्यांनी शांतता राखा,” असं बाबा राम रहीम म्हणाला.
पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानकडे जाणाऱ्या सुमारे 72 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तर याशिवाय मोबाईल आणि इंटरनेट सेवाही 72 तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
पंचकुलामध्ये अनुयायींनी गर्दी केल्याने बाबा राम रहीमला सीबीआय कोर्टापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम सुमारे 800 गाड्यांच्या ताफ्यासह पंचकुला कोर्टात पोहोचला. राम रहीम मागच्या दरवाजाने कोर्टरुममध्ये दाखल झाला.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
बाबा भक्तांनी माध्यमांच्या वाहनांवरही राग काढला. अनेक वृत्त वाहिन्यांच्या ओबी व्हॅन्सची तोडफोड करण्यात आली.
बाबा भक्तांनी संगरुरजवळ गेंदगाव येथील वीज कार्यालय पेटवलं
कोर्टातील या सुनीवणीनंतर राम रहीमच्या भक्तांनी हरियाणामध्ये हैदोस घातला आहे. ठिकठिकाणी जाळपोळ करत हिंसा केली आहे.
हेलिकॉप्टरने रोहतकमधील जेलमध्ये राम रहीम यांना नेण्यात आलं.
हिंसेत झालेली नुकसान भरपाईसाठी बाबा राम रहीमची संपत्ती जप्त करा, असे आदेश पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने दिले आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नोएडातील गौतम बुद्ध नगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहीम सिंह यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. पंचकुलातील सीबीआय न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यांना सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणात किमान सात वर्षे आणि कमाल दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करावा लागला. हिंसाचाराच्या या घटनेत आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 250 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -