बॉलिवूडच्या 'दयावान'चा अलविदा
1968 साली मन का मीत या सिनेमातून बॉलिवडूमध्ये पदार्पण, खलनायकाची भूमिका निभावली
हाथ की सफाई सिनेमासाठी 1975 साली सर्वोत्कृष्ट सहकलाकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार, 1981 साली कुर्बानी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरव
काही दिवसांपूर्वी त्यांचा रुग्णालयातील एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोवरुन त्यांच्या प्रकृतीचा अंदाज बांधता येत होता.
विनोद खन्ना यांच्या जन्मानंतर काही दिवसातच भारताचं विभाजन झालं. त्यानंतर त्यांचं कुटुंब पेशावर सोडून मुंबईत स्थायिक झालं.
विनोद खन्ना यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब अवलंबलं. सध्या ते पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार होते.
विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथोनी’ यांसारख्या शानदार सिनेमात काम केलं होतं. विनोद खन्ना यांनी करिअरची सुरुवात निगेटिव्ह भूमिकेने केली होती. नंतर ते हिरो बनले. विनोद खन्ना यांनी 1971 च्या ‘हम तुम और वो’ मध्ये प्रमुख भूमिका साकारली.
सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पेशावरमध्ये उद्योगपतीच्या घरात 6 ऑक्टोबर 1946 रोजी जन्म. तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार.
विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा ‘एक राणी ऐसी भी’चा ट्रेलर लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला होता. बिग बी अमिताभ बच्चन या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र प्रकृती बिघडल्याने विनोद खन्ना हजर राहू शकले नव्हते.
मुंबईतील हरकिशन दास रुग्णालायत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतंच त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. अखेर आज 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
विनोद खन्ना शेवटचे ‘एक थी राणी’ या सिनेमात दिसले होते. यापूर्वी 2015 मध्ये शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ या सिनेमातही विनोद खन्ना पाहायला मिळाले होते.