यांना अपंग म्हणाल का? शामक दावरच्या शिष्यांचा थरारक डान्स
डान्स नेहमीच थेरोपेटिक आणि व्यक्तिमत्त्व विकास करणारे माध्यम आहे असं यावेळी कोरिओग्राफर शामक दावरने सांगितले.
शुभम पेट्टी हा पायने अपंग, ठेंगणा तसेच अनेक शारिरीक व्याधींनी ग्रस्त आहे. शहनवाझ आणि शुभम सारख्या अनेक मुलांनी एकत्रितपणे एकापेक्षा एक भन्नाट डान्स केले.
‘अद्भूत भारत’ या थिमवर अपंग मुलांनी कला सादर केली. या मुलांचे डान्स अक्षरश: थक्क करणारे होते. धडधाकट माणूसह यांच्यासमोर फिका पडेल असा डान्स या मुलांनी केला.
या कार्यक्रमात मुलांसोबत त्यांच्या प्रशिक्षकांनीही परफॉर्मन्स केले.
23 वर्षीय शेहनवाझ शेख हा पायाने अपंग आहे. शामकच्या डान्स थेरपी क्लासेससाठी तो प्रशिक्षक म्हणूनही काम करतो.
मुंबई तसेच मुंबई बाहेरील अनेक सामाजिक संस्थांमधील अपंग मुलांनाही शामक स्वत: नृत्याचे प्रशिक्षण देतो. मुंबईत बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात या संस्थेच्या मुलांनी अगदी व्हिलचेअरवर बसून डान्स केला.
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावर यांच्या ‘विक्टरी आर्ट फाऊंडेशन’ अंतर्गत भारतातील 12 हजार अपंग मुलांना नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते.