भाजपमधील देशातील नाराज नेते!
अनिल गोटे, आमदार : पक्षातील आयारामांवरुन भाजपवर निशाणा, पक्षातील नाराजी पत्राद्वारे चव्हाट्यावर
एकनाथ खडसे : राजीनामा दिल्यानंतर पक्षानं वाऱ्यावर सोडल्याची भावना, पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
संजय काकडे, खासदार : गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार नसल्याचं भाकित केलं होतं.
आशिष देशमुख, आमदार : वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरुन आक्रमक
नाना पटोले : केंद्र सरकारच्य कृषी धोरणावर टीका करत पटोलेंचा भाजपला रामराम
लालकृष्ण अडवाणी : मोदींच्या उदयानंतर पक्षात बाजूला करण्यात आल्याची भावना, लेख आणि वक्तव्यांमधून नाराजी व्यक्त
अरुण शौरी : मोदी सरकारच्या काळात मानवी हक्कांवर गदा आल्याचा आरोप, अध्यक्षीय पद्धतीनं सरकार चालत असल्याचा आक्षेप
शत्रुघ्न सिन्हा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व निर्ण घेत असल्याचा आक्षेप, बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची आस होती मात्र, पक्षानं दुर्लक्ष केल्यानं शत्रुघ्न सिन्हा आक्रमक
भाजपमधील नाराजांची यादी वाढतच चालली आहे. धुळ्यातील भाजप आमदार अनिल गोटेंनी देखील आता भाजपला घरचा आहेर दिला आहे. यशवंत सिन्हा हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेतृत्वावर टीका करत आहेत.