PHOTO : ...म्हणून असामान्य असूनही मनोहर पर्रिकर इतरांपेक्षा वेगळे होते

मनोहर पर्रिकर 2014 ते 2017 या कालावधीत नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मनोहर पर्रिकर भाजपमधील पहिले नेते होते, ज्यांनी 2013 मध्ये पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचं नाव पहिल्यांदा पुढे केलं होतं.

मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना इकॉनमी क्सासमधून प्रवास करत असत. एअरपोर्टवर इतर प्रवाशांप्रमाणे ते रांगेत उभे राहत असत आणि बोर्डिगं पास घेत असे.
गोव्यातील इतर लोकांप्रमाणेच मनोहर पर्रिकरांनाही फुटबॉल खेळायला आवडत असे.
मुख्यमंत्री असतानाही पर्रिकर आपल्या स्कूटर मुख्यमंत्री कार्यालयात येत असत.
मनोहर पर्रिकरांची साधी राहणी विरोधकांनाही भूरळ पाडायची. पर्रिकर सरंक्षणमंत्री असताना पाकिस्तानवर 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं होतं.
एकदा एक महिला जनता दरबारमध्ये मनोहर पर्रिकरांकडे आपल्या मुलासाठी लॅपटॉप मागण्यासाठी आली होती. मात्र त्या महिलेची मागणी सरकारी योजनेअंतर्गत नव्हती. मात्र पर्रिकरांना स्व:ताच्या पैशाने त्या महिलेला लॅपटॉप खरेदी करुन दिला.
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून त्याच्या कारभार अत्यंत पारदर्शी होता. काम करताना ते वेळेची पर्वा करत नसत. पर्रिकर दररोज 16-18 तास काम करायचे.
मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री झाल्यानंतरही आपली स्कूटर चालवायचे. मुख्यमंत्रीपदी असूनदेखीली ते नेहमी हाफ शर्ट आणि साध्या पॅन्टमध्ये दिसायचे.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं वयाच्या 63 व्या वर्षी कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झालं. साधी राहणीमान असलेले पर्रिकर हुशार राजकीय नेते म्हणून परिचित होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -