✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

उत्तराखंडातील एक अनोळखी गाव

एबीपी माझा वेब टीम   |  18 Jun 2016 03:35 PM (IST)
1

समुद्र सपाटीपासून 15 हजार फुट उंच उत्तराखंडमध्ये कुटी हे छोटंसं गाव आहे. येथील निसर्ग सौंदर्य डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं आहे.

2

2011च्या जनगणनेनुसार, या गावामध्ये फक्त 115 कुटुंबे राहतात. या कुटुंबातील पुरुषांची लोकसंख्या 198 तर महिलांची संख्या 165 आहे.

3

जवळपास कुठेच बाजार नसल्याने इथल्या मोकळ्या जागांवर शेती करून लोक आपल्या गरजा पूर्ण करतात.

4

या गावात १०० अशी घरं आहेत, जी २०० वर्ष जुनी आहेत. त्या घरांची विशिष्ट बांधणी याची साक्ष देतात.

5

कैलास यात्रेला निघालेल्या भाविकांना इथे आराम करायला मिळतो. त्यामुळेच या गावाला पर्यटकांची गृह कुटी असेही म्हटले जाते.

6

रोजचे अन्न शिजवण्यासाठी जंगलातून लाकडे गोळा करणे इतकेच येथील लोकांचे काम आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर इथल्या लोकांना मोठी कसरत करावी लागते.

7

कैलास पर्वताच्या मार्गवरील हे गाव इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांचे नेहमीच अकर्षणाचे केंद्र राहिले आहे.

8

एकीकडे अच्छे दिन, बुरे दिन यावरून प्रमुख राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करीत असतात, सत्ताधारी देश बदल राहा हैचा दावा करतात, तर दुसरीकडे या गावातील लोकांना देशाचे पंतप्रधान कोण आहेत हे देखील माहित नाही आहे.

9

गावच्या मध्यभागी एक लहान मैदान आहे, तिथेच सर्वजण एकत्र होऊन आपले मनोरंजनाची साधने शोधतात.

10

पांडवांच्या वनवासाच्या काळात राजा कुंतिभोजची मुलगी कुंती येथे काही काळ राहिली होती. त्यामुळे या गावाचे नामकरण कुटी असे झाले.

11

डिजिटल इंडियाच्या या युगात आज हे गाव सर्वसुख सुविधांपासून आज वंचित आहे. रात्रीच्या वेळेस या गावचा अंधार नष्ट करण्यासाठी सोलार बॅटरीचा वापर करतात.

12

एका हॉटेलचालकाच्या म्हणण्यानुसार, या गावामध्ये आता फक्त शंभर लोकांचीच वस्ती आहे.

13

सशस्त्र सिमा दल आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसांचे जवान यात्रेकरू आणि ग्रामस्थांना नेहमी मदत करतात.

14

या गावात प्रवेश करण्यासाठी एकच लहान पायवाट आहे. पण तीही पार करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. जराही तोल चूकला तर तो जीवावर बेतू शकतो.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • उत्तराखंडातील एक अनोळखी गाव
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.