नाशिकमध्ये पंचगव्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासोबतच गायींचं महत्व जगाला कळावं, गो हत्या थांबवाव्यात हा संदेशही स्वदेशी संस्थाकडून देण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवजनाने अत्यंत हलक्या आणि पर्यावरणपूरक या मूर्ती असल्याने घरातच बाप्पाचं विसर्जन करुन ते पाणी खत म्हणूनही वापरता येऊ शकतं.
यंदा तर शाडूच्या मूर्तींसोबतच पंचगव्य मुर्त्यांनाही वाढती मागणी दिसून येते आहे. या मूर्तींचा रंग शेणाप्रमाणेच असून नागरिकांच्या मागणीनुसार नैसर्गिक रंग वापरून त्याला रंगकाम केलं जातं.
मात्र आता शासन तसेच अनेक संस्थाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती केली जाते. सध्या नागरिकांकडूनही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल दिसून येतो.
पूर्वी गणेशमूर्ती अशाच पंचगव्यातून तयार केल्या जात होत्या. मात्र नंतर पीओपीचं युग आल्याने तसेच पीओपीच्या मूर्ती आकर्षक आणि किंमतीने देखील कमी असल्याने पंचगव्यच्या मूर्ती कालबाह्य झाल्या होत्या.
देशी गायीचे शेण, गो मुत्र, ताक, दूध आणि तूप वापरुन या बाप्पाच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्याला पंचगव्य मूर्ती तसेच गोमाय गणपती असे देखील म्हटलं जाते. या मूर्ती राजकोट ईथे बनवल्या जात असून त्याची किंमत देखील शाडूच्या मूर्तींप्रमाणेच आहे.
गणेशोत्सव आता थोड्याच दिवसांवर येऊन ठेपला असून बाजारात गणपतीच्या आकर्षक मुर्ती दाखल झाल्या आहेत. मात्र नाशिकमध्ये आता स्वदेशी संस्थांकडून पहिल्यांदाच देशी पंचगव्यापासून बनवण्यात आलेल्या गणेशमूर्ती प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -