उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, शपथविधीला दिग्गजांची उपस्थिती
शपथविधीपूर्वी नीता अंबानी यांनी उद्धव ठाकरे यांचे पूत्र आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही या शपथिविधीला उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 6.40 वाजता राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ केली.
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला त्यांचे भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशीदेखील उपस्थित होते.
शपथविधीनंतर एकमेकांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, अजित पवार आणि प्रफुल पटेल.
तमिळनाडूमधील द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी उपस्थित होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते अहमद पटेलही हजर होते.
शपथविधीपूर्वीचे क्षण, उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव यांना शपथ दिली.