बेस्ट फिनिशर धोनीच्या स्फोटक खेळीचं दिग्गजांकडून कौतुक
धोनी नेहमीच कमाल करतो. पुन्हा एकदा चांगली खेळी केली, असं ट्वीट टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिंग अजून जिवंत आहे, असं म्हणत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉने धोनीच्या खेळीचं कौतुक केलं.
यामुळेच धोनीला बेस्ट फिनिशर म्हणतात, असं हरभजन म्हणाला. शिवाय त्याने अंबाती रायडूचंही कौतुक केलं.
सामन्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे धोनीने त्याच्या खास शैलीत अखेरच्या षटकात चौथ्या चेंडूवर षटकार लगावला आणि विजय मिळवून दिला. या खेळीनंतर दिग्गजांनी त्याचं कौतुक केलं.
207 धावांचं मोठं आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. 74 धावसंख्येवरच चार महत्त्वाचे फलंदाज माघारी परतले होते. मात्र अंबाती रायडू आणि धोनीने रचलेल्या 101 धावांच्या भागीदारीने चेन्नईला विजयाच्या जवळ नेलं.
आयपीएलमध्ये रात्री खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर पाच विकेट्स राखून मात केली. बेस्ट फिनिशर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 34 चेंडूत 70 धावांची खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. धोनीच्या या खेळीत 7 षटकारांचा समावेश होता.
भारतीय संघाचे माजी कसोटीपटू आकाश चोप्रा यांनीही बेस्ट फिनिशर धोनीचं कौतुक केलं. क्रिकेटवर एखादं पुस्तक असेल, तर त्याचा समारोप धोनीच्या चॅप्टरने व्हायला हवा, असं ते म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -