कमाईत बॉलिवूड स्टार्सना टक्कर देणारे टीव्ही कलाकार
एक काळ असा होता, जेव्हा छोट्या पदड्याला अर्थात टीव्हीला कमी लेखलं जायचं. पण आता सिनेमातील मोठमोठ्या कलाकारांनाही छोट्या पडद्याचं महत्त्व समजलं असून ते टीव्हीवर काम करण्यास उत्सुक असतात. चित्रपट कलाकारांइतकीच प्रसिद्धी टीव्ही कलाकारांना मिळते. आता तर कमाईच्या बाबतीतही टीव्ही कलाकार बॉलिवूड स्टार्सना टक्कर देत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'दंगल' सिनेमात आमीर खानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली आणि 'कहानी घर घर की'मधून ओळख निर्माण केलेली अभिनेत्री साक्षी तन्वरही एका एपिसोडसाठी सुमारे 80 हजार रुपये घेते.
बॉलिवूड आणि टेलीव्हिजनचा परिचीत चेहरा रोनित रॉयही एका एपिसोडसाठी सुमारे सव्वा लाख रुपये घेतो. रोनितही राम कपूरप्रमाणे महिन्यातील 15 दिवसच काम करतो.
'बडे अच्छे लगते हैं' मध्ये मुख्य भूमिका साकारणारा राम कपूरही एका एपिसोडसाठी सुमारे सव्वा लाख रुपये घेतो. राम कपूर महिन्यातील 15 दिवस काम करतो आणि उरलेले दिवस कुटुंबांसोबत घालवतो.
टेलीव्हिजन सृष्टीतील सुंदर अभिनेत्री आणि 'एक था राजा एक थी रानी'मध्ये राणीची भूमिका निभावणारी दृष्टी धामीही एका एपिसोडसाठी 60 हजार रुपये घेते.
'गुमराह' या शोचा होस्ट आणि 'ये हैं मोहब्बतें में' रमन भल्लाची भूमिका साकारणारा करण पटेलही एका एपिसोडसाठी 1 लाख रुपयांपासून दीड लाख रुपये घेतो.
'ये रिश्ता क्या कहलाता है'ची अक्षरा म्हणजेच हिना खानही कमाईच्या बाबतीत मागे नाही. हिना खानही एका एपिसोडमधून 1 लाख रुपयांपासून दीड लाख रुपयांची कमाई करते.
टेलीव्हिजन सृष्टीतील सुंदर अभिनेत्री आणि 'एक था राजा एक थी रानी'मध्ये राणीची भूमिका निभावणारी दृष्टी धामीही एका एपिसोडसाठी 60 हजार रुपये घेते.
टेलीव्हिजनची मोस्ट फेवरेट सून आणि 'ये हैं मोहब्बतें में' मालिकेत इशिताची भूमिका साकारणारी दिव्यांका त्रिपाठी एका एपिसोडसाठी 80 हजारपासून 1 लाख रुपये घेते.
'पवित्र रिश्ता' या मालिकेतील अभिनेत्री अंकिता लोखंडे बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यावरुन गायब आहे. पण अंकिताही एका एपिसोडमध्ये 90 हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंतची मागणी करते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -