विद्या चव्हाणांनी दिवाकर रावतेंना रोखून धारेवर धरलं!
हा वाद कोर्टातला असून मी काय करु, असं म्हणत त्यांनी अखेर काढता पाय घेतला. पण विद्या चव्हाण यांनी सरकार काय करतंय हा पाढा कायम ठेवला.
यावर रावतेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत चिडून कोण ओला-उबर? कोणी दिली त्यांना परवानगी असा उलट प्रश्न विचारला. तसंच दळणवळणासाठी लोकल, बस, मेट्रोचे असे इतर पर्याय आहेत, असंही दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं.
या संपाविषयी आमदार विद्या चव्हाण यांनी रावतेंना धारेवर धरलं. या संपामुळे सामान्यांचे नव्हे तर आमदारांचेही हाल होत असल्याचं चव्हाणांनी रावतेंना सांगितलं.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे विरोध, घोषणाबाजीनेच झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना रोखलं. विधानभवनात प्रवेश करताच विद्या चव्हाण यांनी रावतेंना रोखून ओला-उबर संपाबाबात जाब विचारला.
दिवाळीची डेडलाइन उलटून गेल्यानंतरही सरकारने 13 मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ओला, उबर चालकांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे.मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे 30 हजार ओला, उबर टॅक्सीचालक-मालक आजपासून पुन्हा संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे.