जागतिक दर्जाचे फिचर्स असलेली 'ट्रेन 18'
इतके सर्व जागतिक दर्जाचे फीचर्स घेऊन ही ट्रेन सर्व शताब्दी एक्सप्रेसच्या जागी धावणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया ट्रेनमध्ये नवीन डिझाईन केलेले शौचालय आहे. यात झिरो डिस्चार्ज बायो व्हॅक्युम टॉयलेट आहेत, ज्यामुळे रूळ घाण होणार नाहीत.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची अशी टॉक बॅक सिस्टीम ट्रेनमध्ये लावलेली आहे. जी आतापर्यंत कोणत्याच एक्सप्रेसमध्ये नव्हती.
16 डब्यांच्या या ट्रेनमध्ये 2 डबे मोटार कोच, 12 डबे चेयर कार आणि 2 डबे एक्झिक्युटिव्ह क्लासचे असणार आहेत.
ही ट्रेन चालवण्यासाठी इंजिनाची गरज लागत नाही, त्याजागी 2 मोटर कोच यामध्ये आहेत.
भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी मागील काही वर्षात प्रयत्न सुरू झाले. त्याची परिणीती म्हणजे 'ट्रेन 18', जी बनवून पूर्ण झाल्याने 29 तारखेला तिचे फ्लॅग ऑफ केले जाणार आहे.
या ट्रेनला ट्रेनसेट म्हणतात आणि ती अशा प्रकारची भारतातील पहिलीच ट्रेन आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -