✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

भारतातील 6 बेस्ट टूरिस्ट प्लेस

एबीपी माझा वेब टीम   |  27 Sep 2016 02:51 PM (IST)
1

आज जागतिक पर्यटन दिवस आहे. संपूर्ण जगात आज हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भारतही पर्यटन दृष्टीने समृद्ध देश आहे. देश-विदेशातील पर्यटक भारतातील विविध स्थळांना भेट देऊन येथील अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेरात कैद करतात. भारतातील अशाच काही पर्यटन स्थळांबद्दल तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.

2

केरळ: दक्षिणेतील केरळही पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला मोठा समुद्र किनारा लाभल्यामुळे अनेक सुंदर बीच, सोबतच हिरव्यागार वनराईची चादर ओढलेले डोंगर रांगा पर्यटकांचे लक्ष्य नक्की वेधून घेताता. केरळमधील चुआर बीच, कोवलम बीच, मरुदेश्वर बीच, बेकल बीच वर्कला बीच आणि शांघमुघम बीच आदी बीच प्रसिद्ध आहेत.

3

म्हैसूर: म्हैसूरलाही राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला भेट देण्यासाठी पर्यटक अतिशय आतूर असते.

4

उदयपूर: राजवाड्यांच शहर म्हणून ओळख असलेल्या राजस्थानमधील उद्यपूरमध्ये अनेक जुने राजवाडे आहेत. उदयपूरचे नाव पूर्वी मेवाड असे होते. या शहराला ऐतिहासिक महत्त्व असल्याने त्याची ओळख पॅलेस सिटी म्हणून ओळखले जाते. या शहरातील सिटी पॅलेस संग्राहलय आणि सिटी पॅलेस कॅम्पलेक्स ही प्रेक्षणिय स्थळे आहेत.

5

लडाख: हे असे स्थान आहे, जिथे तुम्ही फक्त मे महिन्याच्या शेवटी जाऊ शकता. बाईकवरुन लडाखला जाण्याची तरुणांमध्ये वेगळीच क्रेझ असते. इथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.

6

लोहगड: सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगांमुळे महाराष्ट्रा अनेक किल्ले आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण राज्यात किल्ल्याची बांधणी करुन हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. यातीलच एक किल्ला म्हणजे, लोहगड. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे. यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे.

7

दार्जिलिंग: दार्जिलिंगला क्वीन ऑफ हिल्स म्हटलं जातं. पश्चिम बंगाल स्थित दर्जिलिंग हे चाहाच्या मळ्यांसाठीही विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय येथील डोंगर दऱ्यांमध्ये विस्तारलेली हिरवीगार वनराई पर्यटकांवर नेहमीच भूरळ घालते.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • भारतातील 6 बेस्ट टूरिस्ट प्लेस
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.