मंत्रिगट आणि सुकाणू समितीच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
दरम्यान ज्या पुणतांबा गावातून शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली, त्या पुणतांबा गावाचे सर्वांनी आभार मानले. शिवाय शेतकरी आंदोलनाचा यापुढचा लढा असाच सुरु राहिल, असा निर्धारही व्यक्त केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वामिनाथन आयोगाच्या बाबातीत मुख्यमंत्री सर्वपक्षीयांसोबत पंतप्रधानांना भेटायला जातील. शेतकऱ्यांना कायम सरकारवर अवलंबून रहावं लागू नये, यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी गरजेच्या आहेत. त्यामुळे त्याबाबत आग्रही राहू, असंही राजू शेट्टींनी सांगितलं. शेतकऱ्यांना कायम सरकारवर अवलंबून रहायला लागू नये यासाठी भूमिका मागणार
शेतकरी आंदोलनाच्या काळात ज्यांच्यावर मुद्देमाल जप्त केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, मात्र इतरांचे गुन्हे मागे घेतले जातील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
सरकारच्या तिजोरीत करदात्यांचा पैसा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा फायदा धनदांडग्यांना होऊ नये, यासाठी शेतकरी संघटनाही प्रयत्न करतील, असंही राजू शेट्टींनी सांगितलं.
मात्र अधिवेशनापूर्वी म्हणजे 25 जुलैपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही, तर पुन्हा आंदोलन केलं जाईल, असंही राजू शेट्टी म्हणाले.
सरकारने 31 ऑक्टोबरपासून अल्पभूधारकांना कर्जमाफी देण्याचं मान्य केलं होतं. मात्र त्याबाबत आक्रमक भूमिका घेत आजपासूनच कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली. त्यामुळे आजपासून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळेल, अशी हमी सरकारने दिल्याची माहिती सुकाणू समितीचे सदस्य आणि खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं.
सरकारने सकारात्मक चर्चा करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महत्वाचे निर्णय घेतल्याने 13 जूनला होणारा रोल रोको आणि आंदोलन मागे घेत असल्याचं सुकाणू समितीचे सदस्य आणि खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केलं.
सकाळपासून सरकारशी सकारात्मक चर्चा झाली. सरसकट कर्जमाफीचा मुख्य आग्रह होता. त्यानंतर कसलीही अटतट न ठेवता सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाने छोट्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितलं.
दूध दरवाढीबाबत साखरेप्रमाणे 70-30 असं धोरण लागू करणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं.
शिवसेनेचे दिवाकर रावतेही सरकारच्या समितीमध्ये होते. या प्रश्नावर चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक तोडगा काढल्यामुळे सरकारचे आभार मानले. तसंच शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी असेल, असंही सांगितलं.
शेतकरी आंदोलनाला मोठं यश आलं आहे. कारण सुकाणू समिती आणि सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनीही सरकारचे आभार मानले. यापुढच्या आंदोलनात रक्त वाहणार होतं. मात्र आता रक्तदान करुन या निर्णयाचं स्वागत करु, असं बच्चू कडू म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -