Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज ठाकरेंच्या ठाण्यातील भाषणातील महत्वाचे मुद्दे
नाशिकच्या विकासकामांचा दाखला देत इथेही तसे कामं करण्यासाठी संधी देण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App''शिवसेना-भाजप सत्तेकरता लाचार आहेत, निवडणुकीला भांड भांडले आणि नंतर पुन्हा सत्तेत मांडीला मांडी लावून बसले, अशी परिस्थिती आहे'', राज ठाकरे
शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीही फरक नाही. एकाला झाकावं, दुसऱ्याला काढावं, अशी परिस्थिती आहे. दोघंही भ्रष्टाचारी आहेत, असा घणाघात राज ठाकरेंनी
''भाजपच्याच एका आमदाराने सांगितलं, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पक्षाने उमेदवाराची इच्छा नसताना प्रत्येकी 1 कोटी दिले होते, म्हणजे 288 कोटी 288 उमेदवारांकरता, एवढे पैसे आले कुठून?'' असा सवाल राज ठाकरेंनी केला.
नोटबंदीमुळे एक कोटींच्यावर लोकांच्या नोकऱ्या गेल्या, देशाचं वाटोळं केलं पण भाजपकडे निवडणुकीच्या वेळेला कुठून पैसे येतो?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
मुंबई, ठाण्यात शिवसेनेने जो पैसा खाल्लाय, तुमचा गलथान कारभार, बाळासाहेबांच्या फोटोआड दडवू नका, असंही राज ठाकरेंनी ठणकावलं.
शिवसेनेने होर्डिंगवर बाळासाहेबांचे फोटो लावले आहेत आणि 'बोलतो ते करुन दाखवतो', अशी टॅग लाईन दिली आहे. पण बाळासाहेब बोलायचे ते करायचे, तो अधिकार शिवसेनेला नाही, असा घणाघात राज ठाकरेंनी केला.
''दिव्यातील काही भागातील रहिवासी ट्रेनने मुंब्र्याला जाऊन पाणी आणतात. काय भीषण परिस्थिती आहे ही, वीज, रस्ते, पाणी यांसारख्या सुविधा तुम्हाला वर्षानुवर्षे मिळत नसतील तरीही तुम्ही प्रश्न विचारणार नाही?'', असा सवाल राज ठाकरेंनी जनतेला केला.
त्याच त्याच लोकांना जर तुम्ही निवडून देणार असाल तर मग अनधिकृत बांधकामं ,डम्पिंग ग्राऊंड याच्या तक्रारी करू नका, असंही राज ठाकरे म्हणाले.
25 वर्ष शिवसेना-भाजपच्या हातात ठाण्याची सत्ता आहे, पण यांनी केलं काय तर अनधिकृत बांधकामं वाढवली, त्याची टांगती तलवार आज जनतेच्या डोक्यावर आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
दिव्यात गाडीकरता सोडा, साधा बैलगाडीसाठी पण रस्ता नाहीये, तरीही सेना भाजपला याचं काहीच वाटत नाही. दिव्यात इथे काही लहान मुलं आत्ता भेटून गेली, ते म्हणाले अभ्यास करताना सारखे लाईट जातात, पण याचं कोणालाच काहीच कसं वाटत नाही, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
आयुक्त सांगतात डंम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न 3 महिन्यात सोडवतो आणि मुख्यमंत्री म्हणतात 1 वर्ष लागेल, मुख्यमंत्र्यांना नेमकी अडचण काय आहे?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
ठाण्यातील चारही पक्ष एकत्र बसतात आणि यांचे नेते बिल्डर आहेत, यांची सगळ्यात जास्त अनधिकृत बांधकामं आहेत आणि टांगती तलवार जनतेच्या डोक्यावर आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेला 6 हजार 500 कोटींचं आश्वासन दिलं, पण आजपर्यंत साडेसहा रुपये पण नाही दिले, असा टोलाही त्यांनी लगावला.
''भाजपच्या होर्डिंगवर मुख्यमंत्री सांगतात 'हा माझा शब्द', स्वत:च्या हिंमतीवर खुर्चीवर बसणाऱ्यांनी शब्द द्यावा, बसवलेल्या माणसाने शब्द देऊ नये, मोदींनी उद्या दुसरा माणूस बसवला तर तुम्ही दिलेल्या आश्वासनांचं काय?'', असा सवाल राज ठाकरेंनी केला.
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना हे आश्वासनं कशाच्या आधारावर देत आहेत?, असा सवालही राज ठाकरेंनी केला.
''ठाणे जिल्हा हा भारतातला एकमेव जिल्हा आहे ज्याची लोकसंख्या वेगाने वाढतीये आणि ती देखील बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळें, मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीत भाषण करतात, का तर उत्तर भारतीय मतं आहेत म्हणून त्यांना जपणार. ठाणे हा या देशातला एकमेव जिल्हा आहे, ज्यात 7 महानगरपालिका आहेत, कारण काय तर वाढलेली लोकसंख्या आणि ही लोकसंख्या परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे वाढलीये'', असं राज ठाकरे म्हणाले.
ठाण्यातील दिव्यात राज ठाकरेंची प्रचार सभा झाली. उत्तर भारतीयांच्या मतांसाठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गोंजारलं जातंय असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचाही समाचार घेतला.
रोज संख्या वाढणारा ठाणे हा देशातील एकमेव जिल्हा आहे. केवळ आणि केवळ बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांमुळे ठाण्याची संख्या रोज वाढत आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात एलगार पुकारला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -