टॉप-20 फोटो : महाराष्ट्राच्या सीमेवर मराठ्यांचा एल्गार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सहकार्य करावे, कोपर्डी आणि अन्य ठिकाणी घडलेल्या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन करावे, ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सरकारी परिपत्रके मराठीत द्यावीत, शेतकऱ्यांच्या समस्या दूर कराव्यात, शहाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे बंधू संभाजी महाराज यांची समाधी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादन करू नयेत, रस्ता रुंदीकरणात जागा गेलेल्याना नुकसान भरपाई द्यावी या बरोबरच अन्य मागण्यासाठी मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चा काढून समाजाच्या अभेद्य एकीचे आणि आपल्या ताकदीचे दर्शन घडवले.
शिवाजी उद्यान येथून सुरु झालेल्या मोर्चात एस पी एम रोड, शनी मंदिर मार्ग, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, समादेवी गल्ली येथे अनेक ठिकाणांहून आलेले लोक हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी होत होते. धर्मवीर संभाजी चौकात मोर्चा आल्यावर चहूबाजूला भगवे वादळ घोंगावत असल्याचे अदभूत दृश्य पाहायला मिळाले.
पाहा आणखी फोटो...
छत्रपती शिवाजी उद्यान येथून सुरु झालेल्या मराठा क्रांती मोर्चाची आघाडी विद्यार्थिनी, तरुणी आणि महिलांनी सांभाळली होती. भगवे फेटे, भगवे टोप्या परिधान करून महिला वर्ग मोर्चात सहभागी झाला होता. शहरातील जनतेने आपले सर्व व्यवहार बंद ठेवून मोर्चात सहभागी होऊन आपला उस्फुर्त पाठिंबा मोर्चाला दर्शवला.
बेळगावात मराठा क्रांती मोर्चा पार पडला. मोर्चातील काही निवडक क्षण....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -