पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधील 15 महत्वाचे मुद्दे
काश्मीरप्रश्नी संपूर्ण देशाची एकजूट पाहायला मिळाली. सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन काश्मीरचा मुद्दा मांडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या खास कार्यक्रमात अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये रिओ ऑलिम्पिकची तयारी, देशातील मुद्दे, गणेशोत्सव या मुद्द्यांवर जनतेला काही आवाहनं देखील केली.
क्रीडा दिन म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन. आजच्या दिवशी त्यांच्या कार्याची आठवण करुन द्यावीशी वाटते.
पुलेला गोपीचंद यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यांच्या रुपात भारताला एका उत्तम प्रशिक्षक मिळाला.
पदकाशिवाय भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. पीव्ही सिंधू आणि साक्षी मलिकने पदक मिळवून देशाचं नाव मोठं केलं. शिवाय ललिता बाबरने फायनल गाठून इतिहास रचला, दीपा कर्माकरची कामगिरी भारावून टाकणारी होती. सर्वच खेळाडूंनी समाधानकारक कामगिरी केली.
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला जे काही पदक मिळाले ते मुलींनी मिळवून दिले, त्यांनी सिद्ध केलं की मुली कशातही कमी नाहीत.
ध्यानंचद खेळातील स्पिरीट आणि देशभक्तीचं एक जिवंत उदाहरण होते.
गणेश उत्सव येताच लोकमान्य टिळकांची आठवण येते. त्यांनी 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे', हा प्रेरणादायी मंत्र दिला.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुमच्या शिक्षकांसोबतचे फोटो, आठवणी, प्रेरणादायी गोष्टी Narendramodiapp वर शेअर करा.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणजे शिक्षकदिन.. मी अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांसोबत शिक्षक दिन साजरा करत आहे.
जिवनात जेवढं आईचं स्थान आहे तेवढंच शिक्षकाचं आहे.
लोकमान्य टिळकांप्रमाणेच 'स्वराज्य हीच प्राथमिकता', हा मंत्र घेऊन आपण गणेशोत्सवातून संदेश देऊ शकत नाही का?.
इको-फ्रेंडली गणेशोत्सव ही देखील समाजसेवाच आहे.
मदर तेरेसांनी संपूर्ण जिवन गरिबांच्या सेवेला अर्पण केलं, त्यांना 4 सप्टेंबर रोजी संत ही उपाधी देण्यात येणार आहे.
स्वच्छतेवर 2-3 मिनिटांची चित्रपित किंवा डॉक्युमेंटरी बनवा आणि भारत सरकारला पाठवा.
देशाच्या एकाग्रतेला बळ देणाऱ्या गोष्टींवरच आपण जास्त भर द्यावा. तरच देशाचं उज्ज्वल भविष्य बनवता येईल.