वेतनवाढ आणि महागाई, वेतनवाढीतील 10 महत्वाच्या गोष्टी
वेतनवाढ झाल्यामुळे महागाई वाढण्याचाही धोका वर्तवला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयोगाच्या शिफारशींमध्ये प्रस्तावित भत्त्यांचा समावेश केल्यास तब्बल 23.55 टक्के वेतनवाढ होणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 18 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयोगाने मूळ वेतनात जवळपास 15 टक्के वेतनवाढ करण्याची शिफारस केली होती. नोव्हेंबर 2015 मध्ये वेतन आयोगाने केंद्राला शिफारसी सादर केल्या होत्या.
यामध्ये मूळ वेतनात 14.27 टक्के वेतनवाढ करण्याची तरतूद केली होती.
मोदी सरकारने अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. कॅबिनेटने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 23.55 टक्के पगारवाढ मिळणार आहे.
एक जानेवारी 2016 पासून शिफारशी लागू होतील. वेतन आयोग लागू झाल्यामुळे सुमारे 98 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये 52 लाख पेन्शनधारकांचाही समावेश आहे.
सहावा वेतन आयोग लागू करताना 2008 साली 20 टक्के वेतनवाढीची शिफारस करण्यात आली होती. सरकारने वेतन आयोग लागू करताना आयोगाच्या शिफारसींपेक्षा दुप्पट वेतनवाढ केली होती.
स्वच्छतेवर 2-3 मिनिटांची चित्रपित किंवा डॉक्युमेंटरी बनवा आणि भारत सरकारला पाठवा.
यावर्षीचा सरकारच्या तिजोरीवरील भार पाहता सरकार शिफारसींनुसार वेतनात 18 ते 20 टक्के वाढ करु शकतं, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
ज्यांचं मूळ वेतन 7 हजार रुपये आहे, त्यांचं आता 18 हजार रुपये होईल. तर केंद्रीय कर्मचाऱ्याची सर्वोच्च वेतनवाढ 90 हजारांवरुन अडीच लाख होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -