OMG! सतत टीव्ही पाहिल्याने होतो मृत्यू
2040 पर्यंत कॉम्प्यूटरची चीप सर्वात जास्त वीजेचा वापर करेल. त्यामुळे कॉम्प्यूटर हार्डवेअरचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने आपल्या तंत्रज्ञानात बदल करण्याची गरज आहे. अन्यथा संपूर्ण जगात वीजेचे उत्पादक कितीही केले, तर कॉम्प्यूटर चालवण्यासाठी ती पुरवठा पडणार नाही.
जेवल्यानंतर चीजचा एक तुकडा तुमच्या शरीरातील अॅसिड अटॅकवर नियंत्रण मिळवतो, त्यामुळे तुम्ही निरोगी राहता. एका संशोधनानुसार, तुम्ही जेव्हा जेवण करत असता, तेव्हा तुमच्या आहारातील चपाती, गोड आणि आंबट पदार्थ तुमच्या शरीरात अॅसिड तयार करतात. पण चीजमुळे तुमच्या दातांचे आरोग्य चांगले ठेवते.
आज देशातील 50%पेक्षा जास्त लोक दात स्वच्छ करण्यासाठी टूथ ब्रशचा वापर करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला ज्या दाताच्या समस्या भेडसावतात, त्यातील 95% कारण दात साफ करण्यासाठी टूथ पेस्टचा वापर असल्याचे समोर आले आहे. 15 वर्षाखालील मुलांमधील 70% मुलांच्या दातांमध्ये खड्डे पडतात. हा दावा इंडियन डेंटल असोसिएशनच्या एका रिसर्चमध्ये केला आहे.
आठ तास बैठे काम करण्याऱ्या नोकरीने मृत्यू होऊ शकतो. एका संशोधनानुसार, एकाच जागी काम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीराच्या यंत्रणेमध्ये बिघाड होतो. कारण, जास्तवेळ एकाच जागी बसून राहण्याने रक्त प्रवाह सुरळीत राहू शकत नाही. त्यामुळे तुमचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते.
जपानमधील एका संशोधनानुसार, जास्त टीव्ही पाहण्याने फुफुसामध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता जास्त आहे. जास्त टीव्ही पाहण्याऱ्या व्यक्ती आळशी बनतात, त्यामुळे त्यांची फिटनेसही नसते.
पाण्यात राहूनही बेडूक तोंडाने पाणी पित नाही तर तो आपल्या त्वचेने पाणी शोषून घेतो. तसेच त्याची श्वासोच्छवासाची प्रक्रियादेखील त्वचेमार्फतच होते.
तसेच जास्त झोपणाऱ्या व्यक्ती डिप्रेशनच्या शिकार होऊ शकतात. यूनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे क्लिनिकल प्रोफेसर डेव्हीड हिलमैन यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या मते, जास्तीची झोप ही डिप्रेशनमधील स्लीप एपनिया या आजाराचे लक्षण आहे.
उत्तराखंड सरकार आता रामचरित मानसमधील संजीवनी बुटीचा शोध घेणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी तीन तज्ज्ञांची समिती स्थापन केली असून या प्रकल्पाला लवकरच हिरवा कंदिल मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी राज्य सरकारने 25 कोटीची तरतूदही केली आहे.
जर कॉफी प्रेमी व्यक्ती तोंडाच्या दुर्गंधीपासून त्रस्त असेल, तर त्यावर एक लांब स्ट्रॉ उपाय ठरू शकते. जर तुम्ही स्ट्रॉने कॉफी पित असाल, तर तुमचे दात कॉफीच्या संपर्कात येणार नाहीत. तसेच यामुळे कॉफी तुमच्या तोंडात जास्तकाळ राहणार नाही.