मुंबई आणि ठाणेकरांसाठी शिवसेनेच्या 10 मोठ्या घोषणा
दरम्यान युतीबाबत काहीही बोलण्याचं त्यांनी टाळलं. युतीची अजून चर्चा चालू असून भाजपकडून काही संपर्क झालेला नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
घोडबंदरला मोठं स्टेडियम बांधण्यात येईल. सत्तेत आल्यानंतर कल्याण-डोंबिवली आणि ठाणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जलवाहतुकीचा प्रकल्प ठाणे महापालिका प्राधान्याने सुरु करणार, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
खारेगाव चौपाटी सिंगापूरच्या धर्तीवर अत्याधुनिक आंतराष्ट्रीय पातळीवरची चौपाटी केली जाईल : उद्धव ठाकरे.
सत्तेत आल्यानंतर ठाण्यात पुन्हा एक स्वतंत्र धरण बांधू : उद्धव ठाकरे
स्वच्छता करातून व्यापाऱ्यांची मुक्तता करणार : उद्धव ठाकरे.
ठाण्यात कोळशेत इथे 30 एकरावर भव्य सेंट्रल पार्क उभारलं जाईल : उद्धव ठाकरे
मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा सत्तेत आल्यानंतर ‘बेस्ट’ बसचा प्रवास मोफत करणार, अशी घोषणाही त्यांनी केली. मात्र काही लोक आज सुद्धा म्हणतील की ही आमची जुनीच मागणी होती. पण मागणी मनातल्यामनात करणं आणि पुढे घेऊन येणं, यात फरक आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टोलाही लगावला.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा वचननामा थोडक्यात मांडला. पाणी, रस्ते या मुलभूत सुविधा आणखी दर्जेदारपणे पुरवल्या जातील, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मुंबई : शिवसेनेने जाहीर केलेल्या आरोग्य कवच योजना आणि 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याच्या घोषणेचं मुंबईकरांनी स्वागत केलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
ठाणेकरांसाठी शिवसेनेचा वचननामा लवकरच जाहीर केला जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. उल्हासनगरकरांनाही ही योजना देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना ही मुंबईकरांसोबतच ठाणे, उल्हासनगरसाठीही लागू असेल, असं त्यांनी सांगितलं.