उरी हल्ल्यातील 18 जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाहीः मोदी
भाजप बहुमताने येईल, असा विचारही केला नव्हता, जनतेने भाजपला देशाची सेवा करण्याची संधी दिलीः पंतप्रधान मोदी
पाकिस्तानमध्ये हिंमत असेल तर गरिबी हटवण्याचं युद्ध करा, कोणता देश लवकर गरिबी हटवतो ते पाहाः पंतप्रधान मोदी
भारत दहशतवादासमोर कधीही झुकला नाही, ना कधी झुकणार : पंतप्रधान मोदी
पाकिस्तानी जनतेने त्यांच्या सरकारला विचारावं, दोन्ही देश एकत्र स्वंतत्र झाले, पण भारत सॉफ्टवेअर निर्यात करतो, तुम्ही दहशतवादी : पंतप्रधान मोदी
जे लोक बलुचिस्तान, गिलगिट, पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना सांभाळू शकत नाहीत, ते काश्मीरवर दावा करत आहेतः पंतप्रधान मोदी
जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडणारः पंतप्रधान मोदी
पाकिस्तानची जनता त्यांच्या सरकारविरोधात, दहशतवादाविरोधात आवाज उठवेल, तो दिवस दूर नाहीः पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांनो कान देऊन ऐका, आम्ही उरी हल्ला कधीही विसरणार नाही : पंतप्रधान मोदी
भारतीय जवानांनी मागील काही महिन्यात 110 दहशतवाद्यांचा खात्मा केला. देशाच्या जवानांच्या बलिदानाचा अभिमान आहे. त्यांच्या त्यागाचा अभिमान आहेः पंतप्रधान मोदी
उरी हल्ल्यातील आमच्या 18 जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाहीः पंतप्रधान मोदी
उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच सभेत संबोधित केलं. केरळमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत बोलताना मोदींनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे