मैदानात उतरताच इंग्लंड आज इतिहास रचणार
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2016 01:42 PM (IST)
1
भारत या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने मायदेशात 248 कसोटी सामने खेळले आहेत.
2
इंग्लंडने एकूण 974 सामने खेळले आहेत. यापैकी 349 सामन्यात विजय मिळवला आहे. घरच्या मैदानावर 206 सामन्यांत विजय नोंदवला आहे.
3
मायदेशात 500 कसोटी खेळण्याचा विक्रम इंग्लंड टीमच्या नावावर होणार आहे. घरच्या मैदानावर एवढे कसोटी सामने खेळणारी इंग्लंड पहिलीच टीम आहे. इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर 404 सामने खेळले आहेत.
4
कसोटी मालिकेत पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरताणा इंग्लंड टीमला हा विक्रम रचण्यासाठी कुठल्याही चौकार, षट्कारांची आवश्यकता नाही.
5
बर्मिंघममध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटीत मैदानात उतरताच इंग्लंडची टीम नवीन विश्व विक्रम नावावर करणार आहे.