निगेटिव्ह एनर्जीपासून दूर राहण्यासाठी खास टिप्स!
जांभई - अनेकांचं असं मत असतं की, जांभई म्हणजे कंटाळा आल्याचं लक्षण. पण प्रत्यक्षात तसं नाहीय. जांभईमुळे आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि जांभईनंतर एकप्रकारचा पॉझिटिव्हनेस संचारतो.
इसेन्शियल ऑईल - इसेन्शिय ऑईलच्या वापरामुळेही निगेटिव्ह एनर्जी संपते आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळवता येते.
क्रिस्टल - क्रिस्टल घरात असल्यासही आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. दागिना म्हणूनही अनेकजण क्रिस्टल परिधान करतात.
मीठाचं पाणी - निगेटिव्ह एनर्जी दूर ठेवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे बाथटबमध्ये मीठ टाकून त्यात काही वेळ बसा. यामुळे निगेटिव्ह एनर्जी दूर होते. मात्र, मीठाचं प्रमाण अधिक नसावं.
रिंगिंग बेल्स - बेल्स वाजल्याने निगेटिव्ह एनर्जी निघून जाते, असे मानलं जातं आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. घरात असताना तुम्हाला कायम निगेटिव्ह एनर्जीचा सामना करावा लागत असेल, तर घरा बेल लावून ठेवा.
धूर - अगरबत्ती, धूप किंवा चंदनाचं लाकूड जाळून घरभर फिरवा. घराच्या कानाकोपऱ्यात धूर पसरायला हवा. यामुळे एकप्रकारचं चैतन्यमय वातावरण निर्माण होतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार होण्यास मदत होते.
निगेटिव्ह एनर्जी आपल्याला कायमच मारक ठरते. यामुळे एकप्रकारचा तणाव येतो किंवा एकंदरीतच सर्व गोष्टीत निगेटिव्ह मतं तयार होत जातात. मग ही निगेटिव्ह एनर्जी येते तरी कुठून? तर आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी असतात, ज्यांमुळे आपल्यात निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अनेकदा तर घरात शिरल्यावरच एकप्रकारचं निगेटिव्ह वातावरण दिसतं. याचा अर्थ आपल्या आजूबाजूला एकप्रकारचं निगेटिव्ह वातावरण आहे. मग या निगेटिव्ह वातावरणाला, निगेटिव्ह एनर्जीला पॉझिटिव्ह एनर्जीत बदलायचं असेल, तर काय कराल? यासाठी काही टिप्स....