जीन्स खरेदी करताना तुम्ही ही चूक करताय?
11). बूट-कट किंवा बेलबॉटम जीन्स उंच व्यक्तीनाच शोभून दिसते असा सल्ला आसिफ देतात.
10). कार्गो जीन्सची निर्मिती दुसऱ्या महायुद्धादरम्यान झाली. दुसऱ्या महायुद्धावेळी सैनिकांना वापरासाठी खिशांची संख्या सर्वात जास्त असलेल्या कार्गो जीन्सची निर्मिती करण्यात आली. त्या खिशांमध्ये युद्धावर जाणारे सैनिक जीवनावश्यक वस्तू ठेवत.
9). ज्यांच्या मांड्या मोठ्या असतील त्यांनी टेपर्ड जीन्स वापरल्यास त्यांना चांगली दिसू शकते, असा सल्ला नौफल काझी देतात.
8). सर्वसामान्य बांधा असलेल्या व्यक्तीने आर्क शेप किंवा कर्व्ड जीन्स वापरण्याचा सल्ला फॅशन कंन्सलटंट बिलाल हुसैन देतात.
7). स्किनी जीन्स ज्यांचे पाय बारिक आहे, त्यांना चांगली दिसते. जर एखाद्या सडपातळ बांध्याच्या व्यक्तीने परिधान करू नये असा सल्लाही आसिफ देतात.
6). आसिफ सांगतात की, जीन्सची खरेदी करताना त्याच्या साइजकडे आवर्जून लक्ष द्यावे. यासंदर्भात उदाहरण देताना ते म्हणाले, आफ्रिकी- अमेरिकी मजुरांची शरीरयष्ठी चांगली असल्याने ओव्हरसाइज जीन्स त्यांच्यासाठी बनविण्यात येते. पण हीच जीन्स बारिक आणि सडपातळ बांध्याच्या व्यक्तीने परिधान केल्यास तो त्यात गबाळा दिसू शकतो.
4). जीन्समधील स्ट्रेचिंग वाढविण्यासाठी अनेकवेळा डेनिम (कॉटन) सोबतच लाईक्रादेखील वापरले जाते. जर तुमच्या जीन्समधील डेनिमचे प्रमाण 90 ते 100 च्या दरम्यान नसेल तर ते कापड वापरताना आरामदायी/कम्फर्टेबल वाटत नाही.
1). अमेरिकेतील मजुरांना काम करताना कडक आणि टिकाऊ म्हणून जीन्सचा पर्याय समोर आला. पण आज हीच जीन्स सर्वसामान्यच्या वापरातील फॅशनचा भाग बनली आहे.
5). प्रसिद्ध फॅशन डिझायनर अभिषेक गुप्ता सांगतात की, सर्वसाधारणपणे 650 रुपयांना तयार झालेल्या जीन्सची बाजारपेठेत 1900 रुपयांना विक्री होते. स्वस्त आणि महाग जीन्समध्ये केवळ डेनिमचे प्रमाण कमी जास्त असते.
3). जीन्सची खरेदी करताना लक्षात घ्याव्या लागणाऱ्या गोष्टींबद्दल आसिफ सांगतात की, जीन्सची खरेदी करताना त्यावरील लेबल नेहमी पहावे, कारण याद्वारे जीन्समध्ये कितीप्रमाणात डेनिम म्हणजेच कॉटन वापरण्यात आले आहे याची माहिती मिळू शकते.
2). 19 व्या शतकातील जीन्सचा इतिहास सांगताना प्रसिद्ध फॅशन डिझायनर आसिफ मर्चंट म्हणतात की, 1873 साली अमेरिकेतील मजुरांच्या दैनंदिन वापरासाठी जीन्स कापडाची निर्मिती करण्यात आली.
जीन्स ही आजची फॅशन सर्वज्ञात आहे. प्रत्येकाकडे किमान एकतर जीन्स असतेच असते. मात्र या जीन्सचा इतिहास काय? ती घेतना काय काळजी घ्यावी? याबाबत काही टिप्स