मोबाईलचा बॅटरी बॅकअप वाढवण्यासाठी ही काळजी घ्या!

फोन कम्प्युटर किंवा पॉवर बँकने चार्ज करणं शक्यतो टाळावं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सतत फोन चार्ज करु नका. बॅटरी 20 टक्क्यांपर्यंत आल्यानंतरच तिथून पुढे चार्ज करावी.

बॅटरी एका वेळी कमीत कमी 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्याचा प्रयत्न करा. बॅटरी 100 टक्केच चार्ज करावी हे गरजेचं नाही.
फोन कधीही रात्रभर चार्जिंगला लावू नका, यामुळे बॅटरी खराब होऊ शकते.
अनेक फोनमध्ये चार्जिंगचा स्पीड ठेवण्याचंही फीचर दिलेलं असतं. मात्र बॅकअप वाढवायचा असेल तर कमी स्पीडने चार्जिंग करा.
मोबाईल चार्ज करताना स्क्रीन खालच्या बाजूला करुन ठेवावी, जेणेकरुन बॅटरी गरम झाली तर त्यातील हीट निघून जाण्यास मदत होईल.
स्वस्तातले चार्जर वापरणं टाळावं, तुमच्या मोबाईल कंपनीचाच चार्जर वापरावा. या चार्जरमध्ये सुरक्षेचे काहीही उपाय नसतात. यामुळे बॅटरी खराब होऊ शकते.
तुमच्या मोबाईल कंपनीच्याच चार्जरने मोबाईल चार्ज करा. दुसरा चार्जर वापरल्यास बॅटरी बॅकअप कमी होतो.
मोबाईलच्या बॅटरीची खास काळजी घेतली जाऊ शकते, ज्याने बॅकअप वाढतो.
मोबाईलच्या प्रत्येक बॅटरीची कालमर्यादा असते. मात्र अनेक बॅटरी वेळेपूर्वीच खराब होतात किंवा बॅकअप कमी होतो. त्याची व्यवस्थित काळजी न घेणं हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. फुल चार्ज झाल्यावरही आपण अनेकदा मोबाईल चार्जिंगचा काढत नाही. त्यामुळेच बॅटरी लवकर खराब होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -