टीना आणि अतहरच्या लग्नाचं दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन!
'ऑगस्ट महिन्यात डीओपीटीमध्ये ट्रेनिंगच्या वेळी दोघांची भेट झाली. पहिल्याच नजरेत प्रेम जडल्याचं टीना दाबीने सांगितलं होतं. अतहर फारच चांगला माणूस आहे, अशा भावनाही तिने व्यक्त केल्या होत्या.
2015 साली केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी स्पर्धेत भारतात पहिली आलेली टीना आणि याच परीक्षेत दुसऱ्या स्थानावर आलेला अतहर एकमेकांच्या प्रेमात पडले.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही टीना आणि अतहरच यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.
तर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजनही त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये आवर्जून हजर राहिल्या.
यानंतर 14 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये त्यांच्या लग्नाचं ग्रॅण्ड रिसेप्शन होतं. दिल्लीतील रिसेप्शनमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते.
2015 सालची आयएएस टॉपर टीना दाबी आणि अतहर आमीर-उल शफी खान यांनी अनेक जोडप्यांसाठी 'कपल गोल' आखून दिला आहे. अनंत अडचणींवर मात करत टीना आणि अतहर विवाहबद्ध झाले.
याशिवाय न्याय आणि कायदा तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद हेदेखील टीना आणि अतहर यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित होते.
पारंपरिक लग्नाआधी दोघांनी 20 मार्च रोजी जयपूरच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नोंदणी पद्धतीने लग्न केलं. यानंतर 9 एप्रिल रोजी काश्मिरमधील पहलगाममध्ये त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग झालं. लग्नानंतर सर्व जण दक्षिण काश्मिरमधील अनंतनागमध्ये असलेल्या देवपुरा मत्तान या खान कुटुंबाच्या गावी रवाना झाले.
टीना दाबी मूळची दिल्लीची रहिवासी असून अतहर खान जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी आहे. सध्या टीना दाबीची पोस्टिंग राजस्थानच्या अजमेरमध्ये आहे.